‘लाडकी बहीण’ योजनेचे लाभ सुरू राहावेत? मग करा ही सोपी प्रक्रिया – मंत्री आदिती तटकरे यांचा सल्ला!
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २१ :- मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थ्यांसाठी सरकारने आता e-KYC अनिवार्य केली आहे. महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती देत स्पष्ट केलं की, "ही प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, सहज आणि घरबसल्या पूर्ण करता येईल. यासाठी कुणीही आर्थिक मागणी केल्यास त्याला बळी पडू नका."
या योजनेमुळे महिलांना नियमित आर्थिक लाभ मिळावा यासाठी ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून थेट e-KYC करता येईल.
🔹 प्रक्रिया कशी कराल?
1. ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जा.
2. मुखपृष्ठावरील e-KYC बॅनर वर क्लिक करा.
3. आधार क्रमांक आणि Captcha टाकून Send OTP वर क्लिक करा.
4. मोबाईलवर आलेला OTP टाकून Submit करा.
5. प्रणाली तपासून कळवेल की तुमची KYC आधीच पूर्ण आहे की नाही.
6. प्रक्रिया अपूर्ण असल्यास –
तुमचा आधार पात्र यादीत आहे का ते तपासलं जाईल.
पुढे पती/वडिलांचा आधार क्रमांक भरून OTP द्वारे पडताळणी करावी लागेल.
जात प्रवर्ग निवडून खालील दोन बाबींची खात्री द्यावी लागेल :
1. कुटुंबातील कोणीही शासकीय नोकरीत नसणे किंवा निवृत्तीवेतन घेत नसणे.
2. कुटुंबातील जास्तीत जास्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिला योजनेचा लाभ घेणे.
7. शेवटी, "✅ Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे" असा संदेश दिसेल.