राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून निवडणूकपूर्व आढावा दौऱ्याची घोषणा – जिल्हाभरात तालुका पातळीवर बैठकींची मालिका

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून निवडणूकपूर्व आढावा दौऱ्याची घोषणा – जिल्हाभरात तालुका पातळीवर बैठकींची मालिका
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) कडून निवडणूकपूर्व आढावा दौऱ्याची घोषणा – जिल्हाभरात तालुका पातळीवर बैठकींची मालिका

महाराष्ट्र वाणी 🗞️

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ :– येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या — जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) तर्फे “निवडणूकपूर्व आढावा दौरा” आयोजित करण्यात आला आहे.

या दौऱ्यांतून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये इच्छुक उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून आगामी रणनिती ठरवली जाणार आहे. या आढावा बैठका जिल्हाध्यक्ष, ज्येष्ठ नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत घेण्यात येणार असून पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येईल.

या दौऱ्याचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे –

📅 दि. ०७ नोव्हेंबर २०२५ (शुक्रवार)

🔹 सकाळी १०:०० वा. – छत्रपती संभाजीनगर तालुका

🔹 दुपारी ०१:०० वा. – फुलंब्री

🔹 दुपारी ०४:०० वा. – सिल्लोड

📅 दि. ०८ नोव्हेंबर २०२५ (शनिवार)

🔹 सकाळी १०:०० वा. – सोयगाव

🔹 दुपारी ०१:०० वा. – कन्नड

🔹 दुपारी ०४:०० वा. – खुलताबाद

📅 दि. ०९ नोव्हेंबर २०२५ (रविवार)

🔹 सकाळी १०:०० वा. – वैजापूर

🔹 दुपारी ०१:०० वा. – गंगापूर

🔹 दुपारी ०४:०० वा. – छत्रपती संभाजीनगर (पश्चिम, बजाजनगर)

📅 दि. १० नोव्हेंबर २०२५ (सोमवार)

🔹 सकाळी ११:०० वा. – पैठण

या आढावा दौऱ्याद्वारे पक्षाच्या स्थानिक संघटनांना नवचैतन्य देण्याबरोबरच निवडणूकपूर्व तयारीबाबत स्पष्ट दिशा मिळणार आहे.

👉 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट), छत्रपती संभाजीनगर जिल्हा व तालुका संघटनांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

— महाराष्ट्र वाणी 🗞️

"बातमी खरी, आवाज तुमचा!"