राज ठाकरेंच्या शिवतर्थवर बच्चू कडूंची भेट; कर्जमाफी यात्रेच्या आंदोलनावर सखोल चर्चा
🟠 शेतकऱ्यांसाठी ‘ठाकरे-कडू’ एकत्र!
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई (प्रतिनिधी)दि ६ ऑगस्ट :- प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष व माजी आमदार बच्चू कडू यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतर्थ निवासस्थानी भेट घेतली. या भेटीला विशेष राजकीय आणि सामाजिक महत्त्व प्राप्त झालं असून, आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मोठं आंदोलन उभं राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या बैठकीदरम्यान राज्यातील शेतकरी संकट, कर्जमाफी, वीजबिल माफी, हमीभाव आणि दुष्काळी परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी एक संयुक्त आंदोलन उभारण्याच्या दृष्टीने धोरण आणि दिशा यावर सखोल विचारमंथन करण्यात आलं. या आंदोलनामध्ये मराठवाड्यातून सुरु होणाऱ्या ‘कर्जमाफी यात्रे’ विषयी राज ठाकरे यांना अधिकृत निमंत्रण देण्यात आलं असून, त्यांनी त्यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
राज ठाकरे यांचं मार्गदर्शन घेऊन ही यात्रा केवळ एक राजकीय उपक्रम न राहता, शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारी एक प्रभावी चळवळ ठरेल, असा विश्वास बच्चू कडूंनी व्यक्त केला. या भेटीतून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सर्व पातळ्यांवर संघर्ष करण्याचा निर्धार पुन्हा अधोरेखित झाला आहे.
ही भेट केवळ शिष्टाचारापुरती मर्यादित न राहता, शेतकऱ्यांच्या भविष्याशी निगडित निर्णायक टप्प्याची सुरुवात ठरू शकते, असे जाणकारांचे मत आहे.
🟢 शेवटी संघर्षच शेतकऱ्यांना न्याय देईल…!
(अधिक अपडेटसाठी वाचा – महाराष्ट्र वाणी)