मोदींच्या वाढदिवशी युवक काँग्रेसचा अनोखा विरोध – 'राष्ट्रीय बेरोजगार दिवस' साजरा करत चहा विक्री आंदोलन!
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १७ :– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी महाराष्ट्र युवक काँग्रेसने पारंपरिक शुभेच्छा न देता 'राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार दिवस' साजरा केला. शहागंज येथील गांधी भवनासमोर युवक काँग्रेसने चहा विक्री आंदोलन करत मोदी सरकारच्या रोजगार नीतिवर तीव्र निशाणा साधला.
युवक काँग्रेसचे प्रदेश महासचिव आमेर अब्दुल सलिम यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात पदवीधर तरुणांनी शैक्षणिक पोषाख घालून सहभाग घेतला. फळविक्रेत्यांना दहा रुपयांत चहा विकून कार्यकर्त्यांनी "दोन कोटी नोकऱ्यांचं आश्वासन कुठे?" असा प्रश्न उपस्थित केला.
कार्यकर्त्यांनी मोदी सरकारविरोधात घोषणा देत तातडीने शासकीय नोकऱ्या उपलब्ध करण्याची मागणी केली. यावेळी आमेर अब्दुल सलिम, अॅड. सय्यद अक्रम, शेख अथर, डॉ. पवन डोंगरे, मुजफ्फर खान, अखिल पटेल, शेख फैज, सुफीयान पठाण, मजाज खान, अब्दुल माजिद, योगेश थोरात, साहेबराव बनकर, मो. एहतेशाम खान, फैसल पटेल, आमेर पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 "मोदींच्या वचनांवर तरुणांचा विश्वासघात... म्हणूनच वाढदिवस ठरला ‘बेरोजगार दिन’!"