मुस्लिम समाजाचा ‘मार्टी’साठी झंझावाती आवाज! – भरपावसात धरणे आंदोलन करून सरकारला खडसावले
आयुक्त अनुपस्थित असल्याने निवेदन एका अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आले. यामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट पसरली

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ९जुलै :-
अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक प्रगतीसाठी सरकारने ‘मार्टी’ (MARTI) संस्थेची घोषणा केली, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस अंमलबजावणी न झाल्याने मुस्लिम समाजात तीव्र नाराजी आहे. याच निषेधार्थ मार्टी कृती समितीच्या वतीने दिनांक ८ जुलै सोमवारी हज हाऊस येथे भर पावसात लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.
अल्पसंख्यांक आयुक्त कार्यालयासमोर झालेल्या या आंदोलनात विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, पत्रकार, वकिल आणि नागरिकांनी सहभाग घेतला. आंदोलनादरम्यान आयुक्त अनुपस्थित असल्याने निवेदन एका अधिकाऱ्याच्या हाती देण्यात आले. यामुळे उपस्थितांमध्ये संतापाची लाट पसरली.
मार्टी कृती समितीचे अध्यक्ष ॲड. अझहर पठाण यांनी सांगितले की, “मार्टी ही केवळ योजना राबविणारी संस्था नसून, राज्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक सक्षमीकरणासाठी धोरणात्मक निर्णय घेणारी संस्था आहे. मात्र अद्याप यंत्रणा कार्यरत न झाल्याने हे महत्त्वाचे उद्दिष्टच मागे पडले आहे.”
मार्टी कृती समितीच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे –
मार्टीसाठी ५०० कोटी रुपयांची आर्थिक तरतूद
स्वतंत्र लेखाशीर्ष मंजूर करणे
कंपनी कायदा २०१३ अंतर्गत नोंदणी प्रक्रिया पूर्ण करणे
११ पदांवरील नियुक्त्या त्वरित करणे
छत्रपती संभाजीनगर येथे तात्पुरते कार्यालय सुरु करणे
६ एकर जागेवर मुख्यालय व विभागीय केंद्रांची उभारणी
येत्या शैक्षणिक वर्षापासून सर्व योजना प्रभावीपणे सुरू करणे
अल्पसंख्यांकांसाठी एकसमान लाभ धोरण लागू करणे
या आंदोलनात अनेक मान्यवरांची उपस्थिती:
ॲड. अझहर पठाण, नासेर सिद्दीकी, तय्यब जफर, फैसल खान, इंजि. वाजेद कादरी, अयूब पटेल, मोहंमद असरार, साहेबखान पठाण, फिरदौस फातेमा, रमजानी खान, रहेमान आलम खान, साजिद पटेल, पत्रकार मजहर शेख, एड. वसिम कुरेशी, सर आसिफ, एड. शहेबाज पठाण, नबील उज जमान, शेख मुख्तार, डॉ. अफसर खान, शेख अथर, झाहेद अल कसेरी, संपादक इम्रान बाशवान, जफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
👉 "अल्पसंख्यांकांचा आवाज पाण्यात विरला नाही, तर पावसालाही भेदून सरकारच्या कानावर पोहोचला!"