मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड-सोयगाव तालुक्यातील ८० आत्महत्या ग्रस्त कुटुंबांना मोफत खत वाटप
बळीराजाच्या पाठीशी भाजपचा खंबीर आधार!
महाराष्ट्र वाणी न्युज
सिल्लोड/सोयगाव दि २२ जुलै :– राज्यातील बळीराजावर ओढवलेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आधार देण्यासाठी भाजपा कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आहे.
लोकप्रिय नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सिल्लोड व सोयगाव तालुक्यातील ८० आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांच्या वारसांना मोफत खताचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमात भाजप नेते सुरेश बनकर, महाराष्ट्र अल्पसंख्यांक मोर्चा अध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना नेत्यांनी सांगितले की, "शेतकरी हा आपल्या देशाचा कणा आहे. त्याच्या अडचणीच्या काळात पाठिंबा देणे ही केवळ सामाजिक जबाबदारी नसून आपले कर्तव्यही आहे."
हा उपक्रम म्हणजे केवळ वाढदिवस साजरा करण्याची परंपरा नव्हे, तर संवेदनशील राजकारणाचे प्रतिक असल्याचे मत उपस्थित शेतकऱ्यांनी व्यक्त केले.
शेवटी, बळीराजाला आधार देणारा प्रत्येक हातच खरी खरी शक्ती आहे!