“मी डिप्टी सीएम बोलतोय!” – अजित पवारांचा दबाव; “थेट कॉल करा सर!” IPS अंजलींचं प्रत्युत्तर
महाराष्ट्र वाणी न्युज
सोलापुर, माढा दि ५ :- राजकारणी दबाव टाकून कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण काही अधिकारी मात्र नियमांच्या चौकटीबाहेर न जाता सरळ आणि ठामपणे उभे राहतात. अशाच प्रकारचा प्रसंग नुकताच समोर आला आहे. अवैध खनन प्रकरणी दाखल झालेल्या तक्रारीवर कारवाई सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट हस्तक्षेप करून "कार्यवाही थांबवा" असा आदेश दिला. मात्र संबंधित महिला IPS अधिकारी अंजली यांनी सरळ प्रत्युत्तर देत राजकीय दबावाला शरण जाण्यास नकार दिला.
फोनवरून झाला संवाद :
IPS अंजली कारवाई करत असताना अजित पवार यांनी फोनवरून संपर्क साधत "मी डिप्टी सीएम बोलतोय, कारवाई थांबवा, नाहीतर तुमच्यावरच कारवाई केली जाईल" अशी थेट धमकी दिली. त्यावर अंजली यांनी "मला कसं कळणार तुम्ही डिप्टी सीएम आहात? सर, तुम्ही माझ्या मोबाईलवर थेट कॉल करा. तक्रार आली आहे, तक्रारदाराला मदत करणं आमचं कर्तव्य आहे," असं ठाम उत्तर दिलं.
अजित पवार संतापून "एवढं धाडस कुठून आलं तुझ्यात? माझा चेहरा तरी ओळखतेस का? तुझ्यावर कारवाई होईल," असे शब्द उच्चारल्याची माहिती समोर आली आहे.
अधिकाऱ्यांची शिस्तप्रियता :
दक्षिणेकडून आलेले अधिकारी प्रामाणिकपणा, शिस्त आणि स्वच्छ कारभारासाठी ओळखले जातात. भ्रष्टाचार पाहून दुर्लक्ष न करता थेट कृती करणे, हा त्यांचा स्वभाव. त्यामुळेच अशा अधिकाऱ्यांची सतत बदली केली जाते, दबाव आणला जातो, पण तरीही ते नियमांवर ठाम राहतात.
अजित दादांचा धक्का :
अजित दादाही या प्रसंगाने हादरले. कारण ही अधिकारी "लाडकी बहीण" घाबरणाऱ्यांतली नव्हती. दबाव असूनही तिने नियम आणि कायद्याला प्राधान्य दिलं.
समाजाची अपेक्षा :
अशा प्रकारचे अधिकारी वाढले तरच राजकारणी वठणीवर येतील, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकशाहीत कायद्यापुढे सर्व समान आहेत, हे IPS अंजली यांनी या प्रसंगातून दाखवून दिलं.
🟢 महाराष्ट्राला अशाच निर्भय अधिकाऱ्यांची गरज आहे!