"मार्टी"च्या अंमलबजावणीसाठी ८ जुलैला लाक्षणिक धरणे! — अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी आवाज बुलंद
‘मार्टी’ (MARTI) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ मार्टी कृती समिती
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), ८ जुलै :-
अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था अर्थात ‘मार्टी’ (MARTI) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाची अंमलबजावणी होत नसल्याच्या निषेधार्थ मार्टी कृती समिती, महाराष्ट्र यांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे धरणे ८ जुलै २०२५ रोजी मंगळवारी दुपारी १ ते ५ या वेळेत छत्रपती संभाजीनगर येथील हज हाऊस, अल्पसंख्याक आयुक्तालयाच्या कार्यालयासमोर होणार आहे.
🔹 आंदोलनामागील मुख्य मागण्या पुढीलप्रमाणे –
मार्टी संस्थेस स्वतंत्र BDS मंजुरी द्या!
Company Act 2013 अंतर्गत संस्थेची त्वरित नोंदणी करा!
११ मंजूर पदांवर तातडीने नियुक्त्या करा!
मुख्यालय व इतर विभागांना आवश्यक निधी वितरित करा!
विद्यार्थ्यांना योजनांचा तत्काळ लाभ मिळावा!
अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी समान लाभ धोरण लागू करा!
तात्पुरते कार्यालय सुरू करून संस्था प्रत्यक्ष कार्यान्वित करा!
कृती समितीचे म्हणणे आहे की, ‘मार्टी’ ही योजना सरकारने सुरू केली खरी, मात्र तिच्या अंमलबजावणीत गंभीर दिरंगाई होत आहे. मंजूर पदांवरील भरती प्रलंबित आहे, संस्थेला निधी मिळालेला नाही आणि त्यामुळे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना कोणताही लाभ मिळत नाही.
“आम्ही अधिकार मागतो, भीक नाही!” या निर्धाराने हे धरणे करण्यात येत आहे. शासनाने आमच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देऊन मार्टीच्या अंमलबजावणीत तत्काळ पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी कृती समितीने केली आहे.
“अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांचा हक्क आम्ही मिळवणारच!” – मार्टी कृती समितीचा निर्धार.
अधिक अपडेटसाठी आमच्याशी जोडलेले राहा...