महानगरपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; इच्छुक उमेदवारांची कार्यालयात गर्दी

महानगरपालिकेसाठी वंचित बहुजन आघाडी सज्ज; इच्छुक उमेदवारांची कार्यालयात गर्दी

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २२ जून :- आगामी महानगरपालिकानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने आपल्या तयारीला सुरुवात केली असून, शहर जिल्हा पक्ष कार्यालय, क्रांती चौक येथे एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीसाठी मनपा निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.

बैठकीमध्ये इच्छुक उमेदवारांची मनोगते ऐकून घेण्यात आली. पक्षाच्या जिल्हाध्यक्षांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांच्या भूमिकांचा आढावा घेतला. पक्षाची ध्येयधोरणे निष्ठेने राबवणाऱ्या उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, लवकरच इच्छुकांची पहिली यादी जाहीर होणार आहे.

तसेच मनपा निवडणुकीत कोणत्या पक्षाशी आघाडी करावी यावरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. यासंदर्भात लवकरच दुसरी बैठक घेण्यात येईल, असे शहर जिल्हाध्यक्षांनी सांगितले.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष मा. योगेश बन, पश्चिम शहराध्यक्ष ॲड. पंकज बनसोडे, जिल्हा उपाध्यक्ष रुपचंद गाडेकर, महासचिव मिलिंद बोर्डे, प्रसिद्धीप्रमुख भाऊराव गवई, संघटक सुभाष कांबळे, महिला जिल्हा सहसचिव सुलोचनाताई साबळे, महिला जिल्हा महासचिव कोमल हिवाळे, रवि रत्नपारखे, मेघानंद जाधव, सखाराम सीनगारे, राहुल जाधव, बुद्धभूषण साळवे, सिद्धार्थ बागुल, अंकुश पठारे, नीलेश पठारे, नवनाथ भारती, निलेश अशोक पठारे, महेश तांबे, गोकुळ भुजबळ, गिरजाराम लोखंडे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.