महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची तयारी जोरात – विधानसभा निहाय आढावा बैठक संपन्न
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १ :- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आगामी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) महानगरपालिका निवडणूक २०२५ संदर्भात शहर जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे महत्त्वाची विधानसभा निहाय आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीचे आयोजन शहर जिल्हाध्यक्ष शेख युसूफ यांनी केले. या बैठकीसाठी जिल्हा निरीक्षक मा. आ. वजाहत मिर्झा, खासदार डॉ. कल्याण काळे, मध्य विधानसभा प्रभारी रिजवान सौदागर, पूर्व विधानसभा प्रभारी श्रीमती विद्याताई पाटील, पश्चिम विधानसभा प्रभारी सुरेंद्र घोडजकर, तसेच प्रदेश पदाधिकारी एम. एम. शेख, कमाल फारुकी यांच्यासह सर्व ब्लॉक अध्यक्ष, उमेदवार, ज्येष्ठ नेते, युवक काँग्रेस, NSUI, सेवादल, महिला काँग्रेस, इंटक, अल्पसंख्यांक, OBC, अनुसूचित जाती-जमाती विभाग व विविध सेलचे अध्यक्ष-पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसच्या संघटनात्मक तयारीचा आढावा घेण्यात आला. तसेच मतदारसंघनिहाय संघटन मजबूत करण्यावर आणि जनतेशी थेट संपर्क वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला.
🔹 "जनतेच्या प्रश्नांवर लढा देत काँग्रेस पुन्हा सत्ता मिळवणार," असा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
काँग्रेसची रणनिती ठरली – आता लक्ष्य फक्त ‘महापालिका विजय!’