मराठवाड्यात आजपासून बीफची दुकाने बंद; मासे व मटन-चिकन मार्केटमध्ये ग्राहकांची झुंबड!
'बीफवर बंदीचा निर्णय रोजगारावर घाला, पण सुरक्षिततेसाठी टोकाचं पाऊल' – इसा कुरेशी
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ११ जुलै :
मराठवाड्यातील बीफ विक्रेत्यांनी आजपासून बेमुदत दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ऑल इंडिया जमियतूल कुरेश या संघटनेने हा निर्णय जाहीर केल्याने छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यात बीफ दुकानांचे शटर खाली गेले आहेत. या पार्श्वभूमीवर मटन, चिकन आणि फिश मार्केटमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.
ऑल इंडिया जमियतूल कुरेशचे मराठवाडा अध्यक्ष हाजी इसा कुरेशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, "बीफ व्यवसाय करताना विक्रेत्यांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. जनावरांची खरेदी करताना अडवणूक, विनाकारण गुन्हे दाखल करणे आणि संशयावरून मारहाणीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील सर्व विक्रेत्यांनी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे."
या निर्णयामुळे सेंट्रल नाका व इतर बाजारपेठांतील चिकन, मटन व फिश विक्रीच्या दुकानांवर ग्राहकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, गर्दी वाढूनही किमती स्थिर असल्याची माहिती स्थानिक विक्रेत्यांनी दिली आहे.
'बीफवर बंदीचा निर्णय रोजगारावर घाला, पण सुरक्षिततेसाठी टोकाचं पाऊल' – इसा कुरेशी
संपूर्ण मराठवाडा, खानदेश, विदर्भात आधीच विक्री बंद
आजपासून छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्ह्यातही दुकानं बंद
शेवटी एकच सवाल – बीफ विक्रेत्यांना दिलासा कधी?