"मराठवाडा-पश्चिम महाराष्ट्र कुणबी आरक्षणात; मुस्लीम, आदिवासींसाठी उपसमित्या स्थापन कराव्यात – मनोज जरांगे"
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ :- मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळणार नाही, असा मुख्यमंत्री स्पष्ट संदेश देत असले तरी संपूर्ण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील मराठा समाज ‘कुणबी’ म्हणून आरक्षणाचा लाभ घेणार, असा ठाम दावा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी केला आहे.
आज माध्यमांशी बोलताना जरांगे यांनी सांगितले की, हैदराबाद गॅझेटमुळे या प्रदेशातील सर्व मराठा समाजाला आरक्षणाचा मार्ग खुला होतो. त्यामुळे सरकारने याबाबत संभ्रम न ठेवता समाजाला न्याय द्यावा, अशी त्यांची मागणी आहे.
याचबरोबर, मुस्लीम, आदिवासी तसेच इतर काही घटकांच्या प्रश्नांवर उपाययोजना करण्यासाठी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमित्या स्थापन करण्याची मागणी त्यांनी सरकारसमोर केली.
👉 "आरक्षण हा हक्क आहे, दया नव्हे" – असं सांगत जरांगे यांनी सरकारला ठाम इशारा दिला.