मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा – ५ फेब्रुवारीला सिल्लोड–सोयगावमध्ये शक्तिप्रदर्शन

जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेचा महाप्रचार झंझावात

मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा – ५ फेब्रुवारीला सिल्लोड–सोयगावमध्ये शक्तिप्रदर्शन
मंत्री उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादाजी भुसे यांच्यासह दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभा – ५ फेब्रुवारीला सिल्लोड–सोयगावमध्ये शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड दि ४ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने प्रचाराचा धडाका सुरू केला असून, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी गुरुवारी सिल्लोड व सोयगाव तालुक्यात शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ भव्य जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रचार सभांमध्ये महाराष्ट्र राज्याचे मंत्री तसेच प्रमुख नेते उपस्थित राहणार असून, मतदारांशी थेट संवाद साधत शिवसेनेची ताकद दाखवली जाणार आहे.

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या प्रचार सभांना उपस्थित राहणार आहेत –

मा. ना. श्री. उदयजी सामंत (मंत्री, उद्योग व मराठी भाषा)

मा. ना. श्री. दादाजी भुसे (शालेय शिक्षण मंत्री)

मा. ना. श्री. गुलाबराव पाटील (मंत्री, पाणीपुरवठा व स्वच्छता)

मा. खा. श्री. संदीपानजी भुमरे (खासदार, छत्रपती संभाजीनगर)

आमदार मा. श्री. अर्जुनराव खोतकर

आमदार मा. श्री. अब्दुल सत्तार

सभांचे वेळापत्रक

🔸 सकाळी ८ वा. – निल्लोड, ता. सिल्लोड

सभा प्रमुख : आमदार अर्जुनराव खोतकर

🔸 दुपारी १२ वा. – भराडी, ता. सिल्लोड

सभा प्रमुख : मंत्री उदय सामंत

🔸 दुपारी ३ वा. – शिवना, ता. सिल्लोड

सभा प्रमुख : खासदार संदीपान भुमरे

🔸 सायं. ५ वा. – जरंडी, ता. सोयगाव

सभा प्रमुख : गुलाबराव पाटील, दादाजी भुसे

🔸 सायं. ६ वा. – फर्दापूर, ता. सोयगाव

सभा प्रमुख : गुलाबराव पाटील, दादाजी भुसे

🔸 सायं. ७ वा. – अंभई, ता. सिल्लोड

सभा प्रमुख : गुलाबराव पाटील, दादाजी भुसे

शिवसेनेचा प्रचार शिगेला

या सभांमुळे ग्रामीण भागात शिवसेनेचा प्रचार अधिक वेगाने पोहोचणार असून, निवडणुकीत मोठे शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेना उमेदवारांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

राजकारणातील पुढची मोठी हालचाल जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र वाणी सोबत राहा!