भांडूपगावात ऐतिहासिक अस्मितेचा जल्लोष; किल्ला स्पर्धेला लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

भांडूपगावात ऐतिहासिक अस्मितेचा जल्लोष; किल्ला स्पर्धेला लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
भांडूपगावात ऐतिहासिक अस्मितेचा जल्लोष; किल्ला स्पर्धेला लहान मुलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र वाणी न्युज 

मुंबई (प्रतिनिधी) दि २५ :- सार्वजनिक पूजा समिती, भांडूपगाव यांच्या वतीने दरवर्षी दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यंदा संस्थेच्या ७६व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमांपैकी किल्ला स्पर्धेने विशेष आकर्षण निर्माण केले.

संस्थेचे अध्यक्ष परशुराम कोपरकर यांच्या संकल्पनेतून लहान मुलांमध्ये इतिहासाची ओळख, परंपरेची जोड आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदरभाव निर्माण व्हावा, या हेतूने किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत ४५ स्पर्धकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

स्पर्धेचे परीक्षण जयकांत शिखरे आणि जगदीश धनमेहेर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव धनंजय म्हात्रे, कार्याध्यक्षा रजनी पाटील, खजिनदार महेश पाटील, उत्सव समिती अध्यक्षा ममता उलवेकर, सचिव दिनेश कोपरकर तसेच महेश कोपरकर, महेंद्र कुरकुटे, वर्षा वाघिलकर, सोनम कोपरकर, सरिता म्हात्रे, उमा मळेकर यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. संस्थेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक बांधिलकीचे हे उत्तम उदाहरण असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.