बुड्डी लेन येथे ‘Book of Knowledge’ स्मारकाची मागणी; आयरलैंडच्या सौंदर्यीकरणासाठी निवेदन

बुड्डी लेन समोरील 'आयरलैंड' चे नुतनीकरण करा; 'Book of Knowledge' स्मारकाची मागणी

बुड्डी लेन येथे ‘Book of Knowledge’ स्मारकाची मागणी; आयरलैंडच्या सौंदर्यीकरणासाठी निवेदन
बुड्डी लेन येथे ‘Book of Knowledge’ स्मारकाची मागणी; आयरलैंडच्या सौंदर्यीकरणासाठी निवेदन

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १० जुलै :– जामा मस्जिद बुड्डी लेन समोरील आयरलैंडचा पुन्हा नुतनीकरण करून तेथे ‘Book of Knowledge’ या नावाचे पुस्तकाचे स्मारक उभारावे, अशी मागणी शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अहमद जलीस व इतर नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.

या संदर्भात महानगरपालिकेचे शहर अभियंता यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काही वर्षांपूर्वी महानगरपालिकेने बुड्डी लेनसमोरील जागेवर आकर्षक ‘आयरलैंड’ विकसित केले होते. हे ठिकाण नागरिकांसोबत पर्यटकांचाही केंद्रबिंदू ठरले होते. मात्र, सध्या हे ठिकाण दुर्लक्षित आणि मोडकळीस आलेल्या अवस्थेत असून, याचे सौंदर्य पूर्णतः हरवले आहे.

या पार्श्वभूमीवर आयरलैंडचे पुन्हा नुतनीकरण करून त्याठिकाणी एक लहान उद्यान उभारण्यात यावे, तसेच जामा मस्जिदच्या ऐतिहासिक आणि शैक्षणिक वारशाला अधोरेखित करणारे ‘Book of Knowledge’ हे पुस्तकाचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. मस्जिदेतील शैक्षणिक वारशामुळे येथे देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येत असल्याने या स्मारकाचे महत्व अधिक ठळक ठरेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या मागणीला अहमद जलीस यांच्यासह सय्यद नासेर, सिद्दीकी सलीमोद्दीन, मोहम्मद अशफाक आणि मोहम्मद अजहर यांचीही सहमती आहे.

– महाराष्ट्र वाणी

आपल्याला हक्काच्या बातम्या, थेट तुमच्या भाषेत!