बँक घोटाळा प्रकरणात माजी आमदार सुभाष झांबड यांना सशर्त जामीन
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३१ :- अजिंठा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार सुभाष झांबड यांना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. नोंद असलेल्या दोन गुन्ह्यांपैकी पहिल्या प्रकरणात हा दिलासा देण्यात आला असून सरकारी बाजू ऐकून न्यायालयाने आदेश दिला.
झांबड हे ७ फेब्रुवारी २०२५ पासून न्यायालयीन कोठडीत होते. या प्रकरणात मुख्य आरोपपत्रासह पूरक आरोपपत्र दाखल झाले असून सहआरोपींना यापूर्वीच जामीन मंजूर झाला आहे. सिटी चौक पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद असून दुसऱ्या प्रकरणात सुमारे २१ कोटी रुपयांच्या बोगस ठेवी तारण ठेवून अपहार केल्याचा आरोप आहे.
न्यायालयाने दिलेल्या जामिनास काही अटी घालण्यात आल्या असून त्या अटींचे काटेकोर पालन करणे झांबड यांना बंधनकारक राहणार आहे.