फडणवीस सरकारने 'जनतेच्या योजना' बंद केल्या; 'शिंदे' गप्प – अंबादास दानवे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला!

फडणवीस सरकारने 'जनतेच्या योजना' बंद केल्या; 'शिंदे' गप्प – अंबादास दानवे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १४ :- महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या अनेक योजनांवर बंदी घातल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. माजी विरोधी पक्षनेते आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी आपल्या X (Twitter) हँडलवरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.

दानवे म्हणाले, "सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. अमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता बुलेट ट्रेनच्या री ओढताना दिसतात."

दानवे यांनी बंद करण्यात आलेल्या योजनांची यादीही जाहीर केली आहे :

१️⃣ आनंदाचा शिधा – बंद

२️⃣ माझी सुंदर शाळा – बंद

३️⃣ १ रुपयात पीकविमा – बंद

४️⃣ स्वच्छता मॉनिटर – बंद

५️⃣ १ राज्य १ गणवेश – बंद

६️⃣ लाडक्या भावाला अपरेंटीसशिप – बंद

७️⃣ योजनादूत योजना – बंद

८️⃣ मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना – बंद

शेवटी दानवे म्हणाले, "या योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा आम्ही जनतेसमोर मांडणारच!"