प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना; लाभार्थ्यांस आर्थिक मदत

महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.१२ :- केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजने अंतर्गत श्रीमती ज्योती अनिल चव्हाण यांना दोन लाख रुपये विमा रकमचे वितरण जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते करण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास या कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्र चे उप-विभागीय व्यवस्थापक मुकुंद कांबळे,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक प्रेषित मोघे, गारखेड़ा शाखेचे व्यवस्थापक अभिनव इंगोलेआदी मान्यवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री जीवन ज्योती या योजनेचा उद्देश कुटुंबियांना आर्थिक सुरक्षेची हमी देणे हा आहे. कुटुंबातील सदस्यांच्या आर्थिक सुरक्षिततेकरिता ही विमा योजना आवश्यक आहे, तरी जिल्ह्यातील सर्व पात्र नागरिकांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले.
या योजनेअंतर्गत गरजू कुटुंबास आर्थिक मदतीचा लाभ मिळाला असून, भविष्यातही गरजू नागरिकांनी या योजनेचा जास्तीत लाभ घ्यावा, असे आवाहन बँक ऑफ महाराष्ट्र चे उप-विभागीय व्यवस्थापक मुकुंद कांबळे यांनी केले.
योजनेचे फायदे:१८ ते ५० वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी ही योजना खुली आहे वार्षिक फक्त ४३६ रुपयांच्या प्रीमियममध्ये २ लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते.मृत्यूनंतर कुटुंबियांना थेट आर्थिक मदत दिली जाते.
अधिक माहितीसाठी आपल्या नजीकच्या बँकेस/शाखेस भेट द्या, असे आवाहन करण्यात आले आहे.