पुण्यात महाआरोग्य व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न – 1275 नागरिकांची तपासणी, 90 जणांनी दिलं रक्तदान

पुण्यात महाआरोग्य व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न – 1275 नागरिकांची तपासणी, 90 जणांनी दिलं रक्तदान
पुण्यात महाआरोग्य व रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न – 1275 नागरिकांची तपासणी, 90 जणांनी दिलं रक्तदान

महाराष्ट्र वाणी न्युज 

पुणे दि २७ जुलै :– भारतीय जनता पार्टी व हिंद बाल समाज मंडळ ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने भवानी पेठेतील भवानी माता मंदिराजवळ, माजी नगरसेविका मनिषा ताई लडकत यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

या शिबिरात सुमारे १,२७५ नागरिकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतला, तर ९० जणांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सामाजिक जबाबदारी निभावली. रक्तदात्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमात आमदार सुनील कांबळे, आमदार हेमंत रासने, भाजप पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, तसेच माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले आदी मान्यवर उपस्थित होते.

शिबिराचे संयोजन माजी नगरसेविका मनिषाताई लडकत व माजी नगरसेवक संदीप लडकत यांनी केले होते.

आरोग्य आणि सेवा यांची सांगड घालणारा हा उपक्रम परिसरात समाधानाचा आणि प्रेरणेचा विषय ठरला आहे.