पवारांच्या विचारांना नवी धार! सर्व पदाधिकाऱ्यांचा एकमुखी निर्धार
महाराष्ट्र वाणी
मुंबई (प्रतिनिधी) दि १ :- पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे माजी मंत्री राजेश (भैय्या) टोपे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथील प्रदेश कार्यालयात परभणी शहर व ग्रामीण तसेच छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण संघटनात्मक आढावा बैठक पार पडली.
बैठकीत प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांकडून स्थानिक पातळीवरील प्रश्न, समस्या व अडचणी जाणून घेतल्या. त्या सोडविण्यासाठी त्यांनी मार्गदर्शन करत संघटन अधिक बळकट करण्यावर भर दिला.
यावेळी आदरणीय शरदचंद्र पवार यांच्या विचारांना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकमुखी निर्धार व्यक्त केला.
या महत्वपूर्ण बैठकीस माजी खासदार जयसिंगराव गायकवाड, माजी आमदार चंद्रकांत दानवे, विजय गव्हाणे, संजय वाकचौरे, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र पवार, प्रदेश प्रवक्ते व संघटक सचिव विकास लवांडे, प्रदेश उपाध्यक्ष भीमराव हत्तीअंबीरे, किसान सेलचे राज्यप्रमुख जगन्नाथ काकडे पाटील, परभणी ग्रामीण जिल्हाध्यक्ष अजय गव्हाणे, परभणी शहराध्यक्ष अब्दुल माजिद अब्दुल रशीद, छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील, छत्रपती संभाजीनगर शहर जिल्हाध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन, शहर कार्याध्यक्ष आशिष पवार, नगरसेवक सतींदर ओबेरॉय यांच्यासह विविध सेलचे जिल्हास्तरीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संघटनात्मक ताकद वाढवून पवारांच्या विचारांना गती—आगामी राजकारणात पक्षाची भूमिका ठरणार निर्णायक!