धानोऱ्यात शिवसेनेची प्रचार सभा गाजली; अर्जुन खोतकरांचा विरोधकांवर घणाघात

धानोऱ्यात शिवसेनेची प्रचार सभा गाजली; अर्जुन खोतकरांचा विरोधकांवर घणाघात
धानोऱ्यात शिवसेनेची प्रचार सभा गाजली; अर्जुन खोतकरांचा विरोधकांवर घणाघात

महाराष्ट्र वाणी 

सिल्लोड (प्रतिनिधी) दि.१ :- भराडी जिल्हा परिषद गटातील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासह शिवसेनेचे माजी मंत्री आमदार अर्जुन खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर प्रचार सभा उत्साहात पार पडली.

आमदार अर्जुन खोतकर यांनी आपल्या खास शैलीतील जोरदार भाषणातून सभेला रंगत आणली. केवळ रिकाम्या घोषणा देणाऱ्यांना जनता यावेळी त्यांची जागा दाखवेल, असा इशारा देत त्यांनी विरोधकांवर घणाघाती टीका केली. धानोरा गावाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून, जनतेचा विश्वास हीच आमची खरी ताकद आहे, असे ते म्हणाले.

विकासाला गती द्यायची असेल तर शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करा, असे थेट आवाहन करत खोतकर यांनी सांगितले की, धानोरा व परिसराचा खरा आणि शाश्वत विकास फक्त शिवसेनेच्याच माध्यमातून शक्य आहे. काम करणाऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहा, असेही त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

या प्रचार सभेला शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच गावकरी मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.