दिव्यांग सेवेसाठी मोहीद देशमुखांचा सन्मान; समाजकल्याण विभाग व प्रहार अपंग संघटनेतर्फे गौरव

दिव्यांग सेवेसाठी मोहीद देशमुखांचा सन्मान; समाजकल्याण विभाग व प्रहार अपंग संघटनेतर्फे गौरव
दिव्यांग सेवेसाठी मोहीद देशमुखांचा सन्मान; समाजकल्याण विभाग व प्रहार अपंग संघटनेतर्फे गौरव

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ :- दिव्यांग क्षेत्रात उल्लेखनीय व सातत्यपूर्ण कार्य करून समाजातील वंचित घटकांसाठी आशेचा किरण ठरलेल्या मोहीद देशमुख यांना आज दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी छत्रपती संभाजीनगर येथे भव्य सत्कार करण्यात आला.

हा सन्मान जिल्हा परिषद, छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा समाजकल्याण अधिकारी बाबासाहेब अरावत यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांसह विविध सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

मोहीद देशमुख यांनी गेल्या काही वर्षांपासून दिव्यांग बांधवांसाठी विविध योजनांचे मार्गदर्शन, हक्कांची माहिती, शैक्षणिक व वैद्यकीय मदत, रोजगाराच्या संधी आणि सरकारी सुविधांपर्यंत पोहोच वाढविण्यासाठी विशेष मोहीमा राबवल्या आहेत. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक दिव्यांग नागरिकांना स्वावलंबनाचा मार्ग मिळाला आहे.

कार्यक्रमात बोलताना अधिकारी बाबासाहेब अरावत म्हणाले, “दिव्यांग सेवा ही केवळ दानधर्म नव्हे, तर समाजाप्रती असलेली जबाबदारी आहे. मोहीद देशमुख यांचे काम जिल्ह्यासाठी प्रेरणादायी आहे.”

तर प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी गाडे यांनी देशमुख यांच्या उपक्रमांचे कौतुक करीत, “समाजात सकारात्मक बदल घडवण्याची ताकद त्यांच्या कामात दिसते,” असे नमूद केले.

सत्कार स्वीकारताना मोहीद देशमुख यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानत पुढील काळात आणखी व्यापक स्तरावर दिव्यांग कल्याणासाठी कार्य करण्याची ग्वाही दिली.

 “समाजसेवेतून उमटणारा बदल… महाराष्ट्र वाणी पुढेही अशा कार्यशिल व्यक्तींच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील!”