दहिहांडा-चोहट्टाबाजार परिसरात विजेचा लपंडाव; शिवसेनेने वेधले लक्ष – तांत्रिक त्रुटींवर तातडीची कारवाई होणार!

दहिहांडा-चोहट्टाबाजार परिसरात विजेचा लपंडाव; शिवसेनेने वेधले लक्ष – तांत्रिक त्रुटींवर तातडीची कारवाई होणार!

महाराष्ट्र वाणी न्युज 

अकोला दि २८ जून :– दहिहांडा व चोहट्टाबाजार परिसरात सलग रात्री-बेरात्री वीजपुरवठा खंडित होत असल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा ७ ते ८ तास वीज नसल्याने दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम होत आहे. या तांत्रिक त्रुटींकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला असून, शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अकोट येथील महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली.

यावेळी चोहट्टाबाजार व कुटासा सबसेंटरला पुरवठा करणारी ११ केव्ही लाईन रेल्वे रुळाखालून गेल्याने वारंवार नादुरुस्त होत असल्याचे स्पष्ट करण्यात आले. परिणामी विद्युत खंडिततेचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी दुसरी केबल टाकण्याची तसेच पर्यायी मार्गाने वीजपुरवठा सुनिश्चित करण्याची मागणी करण्यात आली.

शिवसेना शिष्टमंडळाने कुटासा व चोहट्टाबाजार भागात एबी स्वीच बसवण्याची सूचना दिली, जेणेकरून बिघाडाच्या वेळी संपूर्ण परिसराऐवजी फक्त त्या भागाचा पुरवठा बंद राहील. तसेच कुटासा ते दहिहांडा या बंद लाईनचे काम तातडीने पूर्ण करावे, अशीही मागणी झाली.

महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सर्व समस्या निकाली काढण्याचे आश्वासन दिले असून, मुंडगाव फिडरवरून कुटासा व चोहट्टाबाजार सबसेंटर जोडण्याचे कामही लवकरच पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य व शिवसेना जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, पंचायत समिती सदस्य गजानन वानखडे, शिक्षकसेना उपजिल्हाप्रमुख शरद बुंदे, युवासेना उपजिल्हाप्रमुख पप्पु सुरजुसे, सर्कलप्रमुख विलास वसु, धिरज गावंडे, अनिल मोहरकार, जावेदभाई, रामा काकड आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 वीजेच्या लपंडावाला आवर; शिवसेनेच्या पाठपुराव्याला प्रशासना

ची साथ!