तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त नुकसानीची पाहणी; आमदार अब्दुल सत्तार उद्या दौऱ्यावर
महाराष्ट्र वाणी न्युज
सिल्लोड दि १६ :- अंभई व परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पिके पाण्याखाली जाऊन शेतकऱ्यांपुढे संकट उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या समस्या व नुकसानीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी माननीय आमदार अब्दुल सत्तार साहेब उद्या बुधवार, दि. 17 सप्टेंबर रोजी नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत संध्याकाळी 5 वाजता अंभईला येणार असुन तिथेही शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
या दौऱ्यात आमदार सत्तार यांच्यासोबत महसूल, कृषी, पाटबंधारे यासह सर्व संबंधित शासकीय यंत्रणांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष हजेरी लावून आपली व्यथा व नुकसान शासन दरबारी मांडण्याची संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवांचे अतोनात नुकसान झाले असून, शासनाकडून मदत मिळावी यासाठी हा दौरा महत्त्वाचा ठरणार आहे. शेतकऱ्यांनी वेळेत उपस्थित राहावे, जेणेकरून त्यांच्या समस्या थेट आमदारांसमोर मांडता येतील.
ज्या ज्या भागात आमदार येणार आहेत तेथील शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडण्यासाठी उपस्थित राहावे
👉 अंभई व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती – उद्या, बुधवार दि. 17 सप्टेंबर, सायं. 5 वाजता हजर राहा.
दौऱ्याचा तपशील दिला आहे.
✍️ आपल्या बातम्या, आपल्या हक्काच्या व्यथा – महाराष्ट्र वाणी सोबत रहा!