“ठेवीदारांचा आक्रोश थांबवण्यासाठी पावले उचला; जप्त मालमत्ता ठेवीदारांना देण्याची इम्तियाज जलील यांची मागणी”

“आदर्श पतसंस्थेचे ८ लिलाव ‘फ्लॉप’!

“ठेवीदारांचा आक्रोश थांबवण्यासाठी पावले उचला; जप्त मालमत्ता ठेवीदारांना देण्याची इम्तियाज जलील यांची मागणी”
“ठेवीदारांचा आक्रोश थांबवण्यासाठी पावले उचला; जप्त मालमत्ता ठेवीदारांना देण्याची इम्तियाज जलील यांची मागणी”

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि. ९ :- आदर्श नागरिक सहकारी पतसंस्थेच्या जप्त प्रॉपर्टींच्या सलग ८ लिलावांनंतरही एकही विक्री न झाल्याने हजारो ठेवीदार गेली अडीच वर्षे स्वतःच्या पैशासाठी अक्षरशः वणवण भटकत आहेत. या ठेवीदारांच्या न्यायासाठी सातत्याने लढा देणारे माजी खासदार इम्तियाज जलील यांनी आज ठेवीदारांच्या मोठ्या शिष्टमंडळासह जिल्हा उपनिबंधक, सहकार विभागांची भेट घेऊन तगडी मागणी असलेले निवेदन सादर केले.

जलील यांनी केलेल्या मुख्य मागण्या —

👉 जप्त प्रॉपर्टी ठेवीदारांनाच खरेदीची संधी द्यावी.

👉 खरेदी रकमेतून ठेवीदारांची ठेव सेट-ऑफ करून समायोजित करावी.

👉 जप्त झालेली शेती, घरे, दुकाने यांसाठी ठेवीदारांना प्राधान्यक्रमाने दिलासा द्यावा.

👉 ठेवीदारांच्या आर्थिक वेदना थांबवण्यासाठी शासनाने त्वरित हस्तक्षेप करावा.

ठेवीदारांवर मोठा मानसिक ताण; काहींचे मृत्यूही…

आदर्श पतसंस्थेची आर्थिक पडझड झाल्यानंतर हजारो कुटुंबांना गंभीर फटका बसला. काही खातेदारांचा तर धसका बसून मृत्यू झाल्याची उदाहरणे समोर आली आहेत. अनेक वृद्ध व महिलांचे सर्व आयुष्यभराचे संचयित पैसे अडकून राहिले आहेत.

जलील यांचा सातत्यपूर्ण लढा

या प्रकरणात सुरुवातीपासूनच माजी खासदार इम्तियाज जलील हे ठेवीदारांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले आहेत. सर्वात मोठा मोर्चा काढणे, वारंवार प्रशासनाला निवेदने देणे, बैठका घेणे, प्रत्यक्ष ठेवीदारांबरोबर सहकार विभागात धडक देणे… अशा अनेक मार्गांनी त्यांनी ठेवीदारांच्या प्रश्नाला आवाज दिला आहे.

आजच्या भेटीदरम्यानही जलील यांनी स्पष्ट केले की,

“या लोकांचे पैसे अडकून पडले आहेत… त्यांना दिलासा देणे ही प्रशासनाची नैतिक जबाबदारी आहे. जप्त मालमत्ता ठेवीदारांनाच देऊन सेट-ऑफची सुविधा दिल्यास त्यांची अडचण मोठ्या प्रमाणात कमी होईल.”

ठेवीदारांची अपेक्षा — “आम्हाला न्याय हवा!”

अनेक ठेवीदारांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,

“आमचे आयुष्यभराचे पैसे अडकले… दोन-दोन वर्षे धावपळ करत आहोत. प्रशासनाने आता तरी आमची दाद घ्यावी.”

हजारो ठेवीदारांच्या न्यायासाठीची ही लढाई अजून संपलेली नाही — ‘मराठवाडा वाणी’ या प्रकरणावर लक्ष ठेवून आहे!