जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं!

जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं!
जिल्ह्यात पावसाची दमदार हजेरी; बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुललं!

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), २६ जुलै :- गेल्या अनेक आठवड्यांपासून रखरखत्या उन्हामुळे चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. काल दुपारपासून जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली असून, आज सकाळपासूनही पावसाची संततधार सुरूच आहे.

सिल्लोड, पैठण, कन्नड, गंगापूर, खुलताबाद, सोयगाव, फुलंब्री आणि वैजापूर या सर्व तालुक्यांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. या पावसामुळे जमीनीची ओल वाढल्याने शेतीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे.

पावसाच्या आगमनामुळे हवालदिल झालेल्या बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आशेचा किरण दिसून आला आहे. अनेक ठिकाणी शेतकरी शिवारात उतरून खते टाकण्याच्या तयारी करताना दिसत आहेत.

सातत्याने पडणाऱ्या या पावसामुळे आता खरीप हंगामाला जोर येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

🌾 शेती, पाऊस आणि बळीराजा यांचे नाते पुन्हा बहरत आहे – अशीच सगळी भरभराट व्हावी, हीच सदिच्छा!