जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी किरण डोणगावकरांकडे; डॉ. कल्याण काळेंसह नवीन पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा संपन्न

जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी किरण डोणगावकरांकडे; डॉ. कल्याण काळेंसह नवीन पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा संपन्न
जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी किरण डोणगावकरांकडे; डॉ. कल्याण काळेंसह नवीन पदाधिकारी यांचा सन्मान सोहळा संपन्न

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ३ ऑगस्ट :- जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदावरून खासदार डॉ. कल्याण काळे यांची पदमुक्ती करण्यात आली असून त्यांच्या जागी किरण पटील डोणगावकर यांची नव्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. गांधी भवन, शहागंज येथे आयोजित पदग्रहण सोहळ्यात नवीन नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे सोपवण्यात आली.

या सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी डॉ. कल्याण काळे यांच्यासह जिल्ह्यातील अनेक नेत्यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीवर निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कारही करण्यात आला.

कार्यक्रमाला प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व माजी मंत्री अनिल पाटील, श्री. एम. एम. शेख, विलास बापू औताडे, शहराध्यक्ष शेख युसूफ लीडर, प्रा. मोहन देशमुख, रवींद्र काळे, कमल फारुकी, लहुजी शेवाळे, संदीप ढवळे पाटील, डॉ. जफर खान, डॉ. सरताज पठाण, सागर साळुंके, जितेंद्र देहाडे, सय्यद अक्रम, अशोक डोळस, राहुल सावंत, अल्पसंख्याक जिल्ह  अध्यक्ष (ग्रामीण) अनीस पटेल, मोईन इनामदार, अकील पटेल, जगन्नाथ काळे, भाऊसाहेब जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाने काँग्रेसच्या जिल्हास्तरीय संघटनात्मक परिवर्तनाला नवसंजीवनी मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

– वाचत रहा महाराष्ट्र वाणी