जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकार प्रात्यक्षिक सराव

जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकार प्रात्यक्षिक सराव
जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकार प्रात्यक्षिक सराव

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १६ :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात अतिरेकी हल्ला प्रतिकाराची प्रात्यक्षिके करुन सराव करण्यात आला.दहशतवादी हल्ल्यासारखी आपत्ती उद्भवल्यास परिस्थिती हाताळण्याची सज्जता असावी यासाठी हा सराव करण्यात आला.या सरावाची पूर्वतयारी करण्यात आली. त्यानुसार दिनांक १५ रोजी प्रत्यक्ष सकाळी १० ते १२ या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयात प्रात्यक्षिक सरावाचा थरार सुरु होता. जलद प्रतिसाद दलाचे पीएसआय सतिष दिंडे, कमांडो प्रशिक्षक आकाश घोडके, अजिंक्य गाजरे व अन्य्त २२ कमांडो, तसेच बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे १ अधिकारी ७ अंमलदार व १३ कमांडो हजर होते. अतिरेक्यांनी केलेला हल्ला, दडून बसलेल्या अतिरेक्यांचा शोध, ओलीस ठेवलेल्या नागरिकांची सुटका कउन अतिरेक्यांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन करणे इ. अभ्यास या प्रात्यक्षिक सरावात करण्यात आले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, अपर जिल्हाधिकारी संभाजीराव अडकुणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते यांच्या निरीक्षणात हा सराव अभ्यास करण्यात आला,असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारुती म्हस्के यांनी कळविले आहे.