जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात महामहिम राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांचा अभिष्टचिंतन सोहळा संपन्न
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि १९ :- जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात राजस्थानचे महामहिम राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे नाना यांचा अभिष्टचिंतन सोहळा अत्यंत उत्साहात व स्नेहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्याला विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा बँकेच्या वतीने महामहिम राज्यपाल मा. श्री. हरिभाऊ बागडे नाना यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित आमदार अब्दुल सतार यांनी त्यांना अभिष्टचिंतन निमित्त शुभेच्छा दिल्या व आपल्या मनोगतातून त्यांच्या कार्याची व योगदानाची प्रशंसा केली.
याप्रसंगी आमदार सौ. अनुराधा चव्हाण यांनीही आपले विचार व्यक्त करताना, हरिभाऊ बागडे यांनी राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात दिलेले योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले.
या सोहळ्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष अर्जुन पा.गाढे, उपाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे सदस्य, विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोहळ्याचा समारोप उपस्थित मान्यवरांच्या शुभेच्छा आणि अभिनंदनाच्या गजरात झाला. संपूर्ण कार्यक्रमाला उत्साह, स्नेह व आदराची रंगत लाभली.
✨ "राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना यांचे अभिष्टचिंतन सोहळा छत्रपती संभाजीनगरात संस्मरणीय ठरला!"