जि.प.;पं.स.निवडणूकःमनाई आदेश जारी
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि.३ :- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक सुरळीत, निष्पक्ष, निर्भय व पारदर्शक पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी दिलीप स्वामी यांनी दि.५ रोजी सायं.६ ते दि.७ रोजी मतदान प्रक्रिया संपेपर्यंत जिल्ह्यात मनाई आदेश जारी केले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी- कर्मचारी व मतदान करण्यासाठी रांगेत उभे असलेले मतदार वगळून जिल्ह्यात पाच किंवा पाचापेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राच्या १०० मिटर परिसरात कोणत्याही व्यक्तिस मोबाईल फोन, कॉर्डलेस फोन, मेगा फोन, मायक्रोफोन, वायरलेस सेट वापरण्यास, मतदानाची गोपनियता भंग होईल अशी कृती करण्यास, मतदान केंद्रात मोबाईल वापरणे
जिल्ह्यात पाच किंवा पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येणे, मतदान केंद्रतील मतदान प्रतिनिधी यांना मोबाईल वापरण्यासम फोटो काढण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच मतदान केंद्राच्या १०० मिटर परिसरात बंदोबस्तासाठी नेमलेले पोलीस अधिकारी-कर्मचारी वगळून कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास, परवानगी दिलेल्या वाहनांव्यतिरिक्त वाहनांचा वापर करण्यास, निवडणूक विषयक प्रचार करणे. मतदारांना धमकावणे, ठराविक उमेदवाराला मतदान करण्यासाठी दबाव टाकणे, ज्वलनशील , स्फोटक पदार्थ बाळगणे, मनुष्य व मतदान यंत्राला हानी पोहोचू शकेल अशी वस्तू नेण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचा भंग केल्यास ती व्यकी भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहिल,असेही आदेशात स्पष्ट केले आहे.