जागतिक डाक दिना निमित्त "पोस्टकार्डद्वारे वाचनप्रेमाची जाणीव – रीड अँड लीड फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम"
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १० :-
रीड अँड लीड फाउंडेशनतर्फे जागतिक डाक दिनानिमित्त एक अनोखा उपक्रम राबवण्यात आला. बायजीपुरा येथील डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम मोहल्ला बाल वाचनालय आणि अल-हुदा उर्दू हायस्कूलमधील विद्यार्थ्यांना पोस्टकार्ड वाटप करून त्यांच्या आवडत्या पुस्तकांविषयी किंवा लोकप्रिय पुस्तकांविषयी लिहिण्यास सांगण्यात आले.
या कार्यक्रमात फाउंडेशनचे अध्यक्ष मिर्झा अब्दुल कय्युम नदवी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,
" 9 ऑक्टोबर, जागतिक पोस्टकार्ड दिन असून तो संपूर्ण जगभर साजरा केला जातो. डिजिटल युगातसुद्धा पोस्टकार्ड लेखन ही एक सजीव व पारंपरिक अभिव्यक्तीची पद्धत आहे, जिला जपण्याची गरज आहे."
जागतिक डाक दिनाचे महत्त्व आणि इतिहास:
जागतिक डाक दिवस दरवर्षी 9 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. युनिव्हर्सल पोस्टल युनियन (UPU) ची स्थापना 9 ऑक्टोबर 1874 रोजी स्वित्झर्लंडमध्ये झाली होती. यामुळे जागतिक पातळीवर लोकांना एकमेकांशी पत्राच्या माध्यमातून संवाद साधणे शक्य झाले.
डाक सेवा ही एक महत्वाची सामाजिक आणि सांस्कृतिक दुवा ठरली आहे.
1969 साली टोकियो येथे झालेल्या युपीयू काँग्रेसमध्ये जागतिक डाक दिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये लेखन कौशल्य वाढवणे, वाचनाची आवड निर्माण करणे आणि पारंपरिक संवादाच्या माध्यमांबद्दल जागरूकता निर्माण करणे हा उद्देश होता.
कार्यक्रमात शिक्षक, वाचनालयाचे कर्मचारी व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थित सर्वांनी रीड अँड लीड फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले.