“जळगावात अल्पसंख्याक आयोगाचा आकस्मिक दौरा; प्रशासन गाफील, संघटनांची नाराजी”

“जळगावात अल्पसंख्याक आयोगाचा आकस्मिक दौरा; प्रशासन गाफील, संघटनांची नाराजी”

महाराष्ट्र वाणी न्युज 

जळगाव दि २६ :- जिल्ह्यातील मोब लिंचिंग प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे प्रतिनिधीमंडळ मंगळवारी आकस्मिक दौऱ्यावर जळगावात दाखल झाले. मात्र या दौऱ्याची कोणतीही पूर्वकल्पना नसल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली.

आयोगाचे संचालक वसीम शेख आणि डॉ. अहमद शरीफ देशमुख यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची भेट घेऊन सदर प्रकरणांचा सविस्तर आढावा घेतला. पीडितांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना आयोगाने प्रशासनास दिल्या.

आयोगाच्या भेटीवेळी “एकता संघटना”सह अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. संघटनेचे फारुक शेख यांनी आयोगास कागदोपत्री माहिती सादर करून घटनेबाबतची तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच जिल्हा प्रशासनाने पारदर्शक तपास करावा, दोषींना तातडीने शिक्षा व्हावी आणि पीडितांना शासनाकडून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. यासाठी एकता संघटनेतर्फे पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले.

अल्पसंख्याक समाजाच्या सुरक्षेची व न्याय मिळवून देण्याची जबाबदारी प्रशासनावर असून त्याबाबत ठोस भूमिका घ्यावी, असे मत आयोगासह उपस्थित सामाजिक संघटनांनी व्यक्त केले.

आयोगा सोबत उपस्थिती

फारुक शेख, बाबा देशमुख, अझीझ सालार, अनिस शाह, मतीन पटेल, हाफिज रहीम पटेल, मजहर खान, शाहिद मेंबर, अन्वर शिकलगर, फारुक कादरी, रईस कुरेशी, साजिद खान, जामनेरचे जावेद मुल्लाजी, अशफाक पटेल, सिल्लोडचे मतीन देशमुख, अब्रार देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.

👉 अल्पसंख्याक आयोगाचा दौरा हा जळगावातील प्रशासनासाठी मोठा धडा ठरला आहे!