छत्रपती संभाजीनगरात मनसे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

छत्रपती संभाजीनगरात मनसे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगरात मनसे सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ; तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. १७ :- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने शहरात सदस्य नोंदणी अभियानाला आज उत्साहात सुरुवात करण्यात आली. या अभियानाचे आयोजन चंदू नवपुते यांनी केले होते. कार्यक्रमाला स्थानिक कार्यकर्त्यांसह नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.

या कार्यक्रमावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सतनामसिंग गुलाटी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी पक्षाची भूमिका, मराठी अस्मिता आणि आगामी काळातील संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर भाष्य केले. तसेच, जास्तीत जास्त युवकांनी पक्षाशी जोडून महाराष्ट्राच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात प्रशांत जोशी, मुकेश बिडवे, अशोक पवार, हेमंत जोजारे, नीरज गणेश नवपुते, ज्ञानेश्वर बोर्ड, जॉन बोर्गे, मनोज भिंगारे, गणपत नवपुते, शिवा करवंदे, बरेजा, ऋषिकेश तुपे, ओम जिते, पंकज सवाई, राजू घोरपडे पाटील आणि यश बर्वे यांची प्रमुख उपस्थिती होती.

सदस्य नोंदणी अभियानामुळे मनसेच्या संघटनात्मक बळकटीस चालना मिळणार असून, शहरात पक्षाचा विस्तार अधिक वेगाने होणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

👉 “मनसेच्या या नव्या अभियानामुळे शहराच्या राजकारणात नवचैतन्य निर्माण होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे!”