छत्रपती संभाजीनगर येथे पर्यावरण परिषदेची बैठक संपन्न

छत्रपती संभाजीनगर येथे पर्यावरण परिषदेची बैठक संपन्न
छत्रपती संभाजीनगर येथे पर्यावरण परिषदेची बैठक संपन्न

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ११ : – विभागीय आयुक्त कार्यालयात पर्यावरण, वन व जलवायू परिवर्तन संवर्धन परिषदेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस अतिरिक्त विभागीय आयुक्त खुशालसिंह परदेशी तसेच मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रातील पर्यावरण क्षेत्रात कार्यरत १७ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

बैठकीत बीज महोत्सव, चला सावली पेरूया, हरित उत्सव, जैवविविधता केंद्र उभारणी, ऑक्सिजन पार्कचा अनुभव, शालेय समित्यांद्वारे पर्यावरण जनजागृती, शेतकरी-वन्यप्राणी संघर्ष आणि शाश्वत वृक्षलागवड अशा मुद्द्यांवर चर्चा झाली.

विभागीय आयुक्त पापळकर यांनी जिल्हास्तरावर संस्थांनी एकत्र येऊन शासकीय योजना व स्वयंसेवी उपक्रमांचा संगम घडवून आणण्याचे आवाहन केले. तसेच "एक गाव – एक तालुका" या पद्धतीने उपक्रम राबविल्यास ठोस परिणाम साधता येतील, असे मत व्यक्त केले.

बैठकीस जयाजी पाईकराव (हिंगोली), आनंदराव आसोलकर (छ. संभाजीनगर), भिमराव भिसे (हिंगोली), सारंग साळवी (परभणी), सुपर्ण जगताप (लातूर), पुष्कराज तायडे (जालना), संतोष रेपे (बीड), अमृत सोनवणे (लातूर), डॉ. बी. आर. पाटील (धाराशिव), सिद्धार्थ सोनवणे (बीड), मुरलीधर बेलखोडे (वर्धा), दुर्गा भड (अकोला), यशंवत पांडे (अमरावती), विठ्ठल बदखल (चंद्रपूर), अभय देशपांडे व प्रदीपकुमार (नंदुरबार) यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.