छ. संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी सेवानिवृत्त; पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरव समारंभ

छ. संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील अधिकारी सेवानिवृत्त; पोलीस अधीक्षक कार्यालयात गौरव समारंभ

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ३१ जुलै :- छ.संभाजीनगर ग्रामीण पोलीस दलातील तीन पोलीस अधिकारी नियमित वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून, त्यांचा गौरव समारंभ पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडला.

या कार्यक्रमात मा. डॉ. विनायकुमार राठोड (पोलीस अधीक्षक) आणि मा. अन्नपूर्णा सिंह (अप. पोलीस अधीक्षक) यांची प्रमुख उपस्थिती होती.

सेवानिवृत्त होणाऱ्यांमध्ये

1. जनार्धन बाबुराव मुरमे – पोलीस उपनिरीक्षक (सेवा कालावधी: 35 वर्षे)

2. राजेंद्र राजाराम सावंत – श्रेणी पोलीस उपनिरीक्षक (सेवा: 36 वर्षे)

3. चंद्रकांत बाळा बोर्डे – पोलीस शिपाई

यांचा समावेश आहे. या तिघांनी कुटुंबासह उपस्थित राहून गौरव स्वीकारला.

यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. राठोड यांनी सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचे स्मृतीचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार केला. त्यांनी आपल्या भाषणात त्यांच्या प्रामाणिक, शिस्तबद्ध व कर्तव्यनिष्ठ सेवेला सलाम करत कृतज्ञता व्यक्त केली.

"सेवेत असताना अनेक वेळा कुटुंब, प्रकृती याकडे दुर्लक्ष होतं. मात्र आता निवृत्तीनंतर स्वतःच्या आणि कुटुंबाच्या काळजीसाठी वेळ द्या," असा सल्लाही त्यांनी दिला.

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना निवृत्तीच्या दिवशीच सेवा लाभ

पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानुसार, निवृत्त अधिकाऱ्यांना पेन्शनसह सर्व लाभ त्याच दिवशी देण्यात आले. त्यामुळे कोणतीही कार्यालयीन धावपळ न होता समाधान व्यक्त करण्यात आले.

पुत्रकांडून भावना व्यक्त

सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या मुलांनी आपल्या भावना व्यक्त करत वडिलांच्या पोलीस सेवेला सलाम केला. "सणांच्या दिवशी वडील घरी नसत, पण आता त्यांच्यासोबत वेळ मिळणार हे खूप आनंददायक आहे," असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष मेहनत

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. प्रशांत महाजन (पोलीस निरीक्षक – पोलीस कल्याण) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पोलीस अंमलदार हबीब शेख, प्रवीण पंडित आणि आशा बांगर यांनी विशेष मेहनत घेतली.

 आता वेळ आहे कुटुंबासाठी...!

सेवानिवृत्ती म्हणजे शेवट नव्हे, नव्या आयुष्याची सुरुवात!