चाकू लावून मारहाण करत जबरी चोरी! बिडकीन पोलिसांनी 24 तासात तिघांना पकडलं, 91 हजारांचा मुद्देमाल जप्त

चाकू लावून मारहाण करत जबरी चोरी! बिडकीन पोलिसांनी 24 तासात तिघांना पकडलं, 91 हजारांचा मुद्देमाल जप्त
चाकू लावून मारहाण करत जबरी चोरी! बिडकीन पोलिसांनी 24 तासात तिघांना पकडलं, 91 हजारांचा मुद्देमाल जप्त

(महाराष्ट्र वाणी प्रतिनिधी)

बिडकीन दि १५ :- चाकूचा धाक दाखवत मारहाण करून जबरी चोरी करणाऱ्या तिघा आरोपींना बिडकीन पोलिसांनी अवघ्या 24 तासात जेरबंद करत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत तब्बल 91,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी पोलीस ठाणे बिडकीन येथे फिर्यादी अविनाश लहु राठोड (वय 27, रा. राक्षस भुवन, बीड / सध्या नाशिक) यांनी तक्रार दाखल केली होती.

फिर्यादी हे दिनांक 10 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 ते 9.45 दरम्यान चितेगाव येथे थांबले असता तीन अनोळखी इसमांनी स्प्लेंडर मोटरसायकलवर येऊन त्यांच्या पोटाला चाकू लावला. त्यांना अजंठा फार्मा कंपनीच्या मागील निर्जन जागेत नेऊन चापट-बुक्क्यांनी मारहाण केली.

त्यानंतर फिर्यादीचा 15 हजारांचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच मोबाईलमधील फोनपेचा पासवर्ड जबरदस्तीने घेऊन 7,282 रुपये ऑनलाइन काढून घेतले.

या प्रकरणी पोलीस ठाणे बिडकीन येथे गु.र.नं. 91/2026 कलम 309(6), 3(5) भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

✅ 24 तासात आरोपी जेरबंद

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी दिनांक 11 फेब्रुवारी रात्री 10.30 वाजता चितेगाव भुतबंगला परिसरात शोध घेतला असता तिन्ही आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी 2 कि.मी. पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले.

अटक आरोपींची संपूर्ण नावे:

करण प्रकाश गिरी (वय 24)

रा. खरपुडी, जि. जालना

सध्या: मन्साळी स्केअर, जुना पिंपळवाडी रोड, शिर्डी, ता. राहता, जि. अहिल्यानगर

आदित्य अमोल पगारे (वय 22)

रा. फारोळा, जिल्हा परिषद शाळेजवळ, ता. पैठण, जि. छत्रपती संभाजीनगर

गौरव कैलास पगारे (वय 21)

रा. फारोळा, ता. पैठण

सध्या: शिऊर, राजवाडा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ, ता. वैजापुर, जि. छत्रपती संभाजीनगर

✅ जप्त मुद्देमाल

आरोपींकडून पुढील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे:

फिर्यादीचा 15,000 रुपयांचा मोबाईल

6,800 रुपये रोख

20,000 रुपयांचे दोन मोबाईल

गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपयांची विना नंबर स्प्लेंडर मोटरसायकल

मारहाणीसाठी वापरलेल्या दोन लाकडी काठ्या

एकूण जप्त मुद्देमाल: 91,800 रुपये

👮‍♂️ ही कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व पथक

ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. विनयकुमार राठोड,

अपर पोलीस अधीक्षक श्रीमती अन्नपुर्णा सिंह,

उपविभागीय पोलीस अधिकारी पैठण विभाग श्री. सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

प्रत्यक्ष कारवाई करणारे अधिकारी:

सहायक पोलीस निरीक्षक श्री. निलेश शेळके

पोलीस उपनिरीक्षक श्री. मनोज पाटील

पोहेकॉ/847 अजिनाथ शेकडे

पोहेकॉ/937 गणेश खंडागळे

पोहेकॉ/89 संजय चव्हाण

पोना/1636 राजु चव्हाण

✨ अशाच धडाकेबाज बातम्यांसाठी वाचत राहा – महाराष्ट्र वाणी!