ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधी वक्तव्याचा महाराष्ट्रभर निषेध – पडळकरांविरोधात पुण्यात तीव्र आंदोलन
आंदोलनात महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष जुबेर मेमन यांचा सहभाग
महाराष्ट्र वाणी न्युज
पुणे दि ८ जुलै :– भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ख्रिश्चन धर्मगुरूंविरोधात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महाराष्ट्रभर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर ख्रिश्चन समाजाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनात महाराष्ट्र मुस्लिम कॉन्फरन्सचे संस्थापक अध्यक्ष जुबेर मेमन यांनी सहभाग घेत पडळकर यांच्या वक्तव्याचा जाहीर निषेध नोंदवला. मेमन म्हणाले, “कोणताही राजकीय नेता कुठल्याही धर्माविरोधात अपमानास्पद वक्तव्य करतो, तर आम्ही त्याचा तीव्र विरोध करू आणि अशा वक्तव्यावर कठोर शासन व्हावे, यासाठी पाठपुरावा करू.”
या निषेध आंदोलनात पुणे शहर व जिल्ह्यातील ख्रिश्चन समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलन शांततेत पार पडले असले तरी त्यातून पडळकरांच्या विधानांविषयी असलेली अस्वस्थता स्पष्टपणे व्यक्त झाली.
शेवटी एकच मागणी – धार्मिक सलोखा टिकवा, द्वेषाचे राजकारण थांबवा
!