"एस.डि. मार्टचा थाटात शुभारंभ; एकाच छताखाली संसारोपयोगी वस्तू, सवलतींचा वर्षाव!"
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि.१५ :–
स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जटवाडा रोडवरील सारा सोसायटी लगत आज एस.डि. मार्टचे शानदार उद्घाटन करण्यात आले. देवळाईचे माजी सरपंच करीम पटेल यांच्या हस्ते फित कापून या नव्या व्यावसायिक उपक्रमाला शुभारंभ झाला.
बी.टेकचे उच्च शिक्षण घेतलेल्या शोहेब फारुक देशमुख यांनी शिक्षणानंतर उद्योजकतेच्या वाटेवर पाऊल ठेवत एस.डि. मार्टची स्थापना केली आहे. ग्राहकांना एकाच छताखाली वाजवी दरात दर्जेदार संसारोपयोगी वस्तू उपलब्ध करून देणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या भव्य मार्टमध्ये –
उच्च प्रतीचे अन्नधान्य, तांदूळ, किराणा
स्टेशनरी साहित्य
घरगुती गरजांच्या अनेक वस्तू
अशा विविध श्रेणीतील वस्तूंवर २० ते ५० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे.
"ग्राहकांनी एकदा आवश्य भेट द्यावी," असे आवाहन श्री. शोहेब देशमुख यांनी केले.
उद्घाटन सोहळ्यास हाजी अब्दुल अजीम (ए-वन किराणा शाॅपीचे मालक), ताहेर देशमुख, फारुक देशमुख, मुजीब देशमुख, पाश्शु पटेल, हेमंत पाटील यांच्यासह जटवाडा रोड परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी शोहेब देशमुख यांना पुढील वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
शेवटी एकच – दर्जेदार खरेदी, वाजवी दरात आणि एकाच छताखाली… एस.डि. मार्टमध्ये तुमचं स्वागत आहे!