“एका शेतकऱ्याचा मुलगा आज कृषीमंत्री!” – दतात्रय भरणेंचे भावनिक वक्तव्य
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि १ ऑगस्ट :- “शेतकरी कुटुंबात जन्मलो, वाढलो... आज त्यांच्याच हक्कासाठी मंत्रीपदाची जबाबदारी!” अशी भावनिक भावना व्यक्त करत दतात्रय भरणे यांनी कृषीमंत्रीपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर आपल्या भावना व्यक्त केल्या.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी कृषी खात्याची जबाबदारी सोपवल्याबद्दल भरणेंनी त्यांचे आभार मानले. त्यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांचे दुःख आणि अडचणी मला अंतःकरणातून समजतात. आता त्यांच्या हक्कासाठी आणि प्रगतीसाठी काम करण्याची हीच वेळ आहे.”
भरणेंनी ‘शेतकऱ्यांचा सन्मान, शाश्वत शेती आणि ग्रामीण समृद्धी’ हे आपले मुख्य उद्दिष्ट असल्याचे स्पष्ट करत, शेतकऱ्यांचा आवाज शासनाच्या धोरणांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेतीच्या मुळाशी गेलेली नेतृत्वशैली – शेतकऱ्यांना आता आशेचा किरण!