इकरा थीम महाविद्यालयात ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा
महाराष्ट्र वाणी न्युज
मेहरूण (जळगाव)दि ९ :– इकरा एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (रा.से.यो.) एककाच्या वतीने ९ ऑगस्ट रोजी ‘जागतिक आदिवासी दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी प्र. प्राचार्य डॉ. चांद खान तर प्रमुख पाहुणे व व्याख्याते म्हणून प्रो. नफिसा तडवी उपस्थित होत्या. त्यांनी आदिवासी समाजाची जीवनशैली, आहार-विहार आणि शैक्षणिक समस्या यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक डॉ. शेख हाफिज यांनी तर सूत्रसंचालन डॉ. तन्वीर खान यांनी केले. या वेळी डॉ. फिरदौस शेख, डॉ. शेख इरफान, डॉ. राजू गवरे, डॉ. कहकशा अंजुम यांसह प्राध्यापक, कर्मचारी व स्वयंसेवक उपस्थित होते.
कार्यक्रमाचा समारोप डॉ. अमिन काझी यांच्या आभारप्रदर्शनाने झाला.
महाराष्ट्र वाणी – शिक्षण, संस्कृती आणि समाजातील महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत!