इंजि. इफ्तेखार शेख यांचे आवाहन — “चला, पदवीधर मतदार होऊ या!”

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणीला सुरुवात

इंजि. इफ्तेखार शेख यांचे आवाहन — “चला, पदवीधर मतदार होऊ या!”

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि १४ :- भारत निर्वाचन आयोगाच्या निर्देशानुसार औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) विभागातील पदवीधर मतदारसंघासाठी मतदार नोंदणी अभियानास प्रारंभ झाला आहे.

यापूर्वी झालेल्या निवडणुकीतील सर्व नोंदणी रद्द झाल्यामुळे पुन्हा नव्याने नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीसाठी उमेदवार सन २०२२-२३ पर्यंतच्या कोणत्याही विद्यापीठाचा पदवीधर असणे गरजेचे आहे.

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील पदवीधर नागरिकांना ही नोंदणी लागू आहे.

नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत —

१) आयडी साईज रंगीत फोटो

२) आधार कार्ड व मतदान कार्ड

३) पदवी (डिग्री) प्रमाणपत्र / समकक्ष डिप्लोमा प्रमाणपत्र / अंतिम वर्षाची गुणपत्रिका

४) नावात बदल असल्यास राजपत्र (गॅझेट), विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅनकार्ड

५) हे सर्व कागदपत्रे फॉर्म क्रमांक १८ सोबत संबंधित तहसिल कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

नोंदणीसाठी १ ऑक्टोबर २०२५ ते ६ नोव्हेंबर २०२५ ही मुदत निश्चित करण्यात आली आहे.

> “चला, पदवीधर मतदार होऊ या!” — असे आवाहन इंजिनिअर इफ्तेखार शेख यांनी नागरिकांना केले आहे.