“आदर्श ग्राम, विधवांना आधार, वृद्धांना काठी – समाजासाठी झटणाऱ्या पंकज ठाकरे यांचा गौरव”
महाराष्ट्र वाणी न्युज
आकोला (प्रतिनिधी)दि १८ :– “बोलते नव्हे तर कर्ते व्हा” या तत्त्वज्ञानावर चालत विदर्भात तब्बल २५० गावांमध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या कर्मयोगी फाऊंडेशन संस्थेला “नटश्रेष्ठ निळू फुले समाज वैभव पुरस्कार” जाहीर झाला आहे. १७ ऑगस्ट रोजी आकोला येथील जानोरकर सभागृहात मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
कर्मयोगी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पंकज ठाकरे यांनी कुठलाही राजकीय वा आर्थिक वारसा नसतानाही मित्र परिवाराच्या साथीने सामाजिक बांधिलकीचे ४५ उपक्रम राबवले आहेत. त्यामध्ये –
आदर्श ग्राम निर्मिती,
कोरोना काळात सलग ७१ दिवस मिष्टान्न अन्नदान,
२०३ विधवा महिलांना शिलाई मशीन, ४०३ मुलींना सायकल वाटप,
१० हजार वृद्धांना आधारकाठी,
नेत्रतपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर,
शेतकरी व गरजूंसाठी आर्थिक मदत,
फुटपाथवरील व्यवसायिकांना छत्री वाटप,
ग्रामस्वच्छता, नदीघाट व मोक्षधाम स्वच्छता उपक्रम,
तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण
अशा विविध समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश आहे.
पुरस्कार स्विकारताना पंकज ठाकरे म्हणाले, “हा सन्मान मानवता जपणाऱ्या सर्व दानशूर व श्रमिकांच्या नावे आहे. विदर्भातील प्रत्येक गाव आदर्श व्हावे, नागरिक आत्मनिर्भर व्हावेत, यासाठी आमचे प्रयत्न सुरूच राहतील. नटश्रेष्ठ निळू फुले आर्ट फाऊंडेशनने दिलेला हा पुरस्कार आमचा उत्साह द्विगुणित करणारा आहे.”
“समाजासाठी झटणाऱ्यांचा हा गौरव… विदर्भात नवा आदर्श घडविण्याची प्रेरणा ठरतोय!”