अवकाळी पावसाचा सिल्लोडला तडाखा; पांडुरंग तांगडे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, तातडीने मदतीची मागणी

अवकाळी पावसाचा सिल्लोडला तडाखा; पांडुरंग तांगडे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, तातडीने मदतीची मागणी
अवकाळी पावसाचा सिल्लोडला तडाखा; पांडुरंग तांगडे पाटील शेतकऱ्यांच्या बांधावर, तातडीने मदतीची मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड दि १८ :- गेल्या दोन-तीन दिवसांपासून झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच काही ठिकाणी झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे ग्रामीण भागात मोठे नुकसान झाले आहे. अनेक रस्ते वाहून गेले असून नाल्यातील पाणी शेतात घुसल्याने पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. साधारण १७ हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांवर परिणाम झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने व्यक्त केला आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे छत्रपती संभाजीनगर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी आज आमठाणा, घाटनांद्रा, चारनेर, चारनेरवाडी आदी गावांना भेट देऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची व्यथा ऐकून घेतली.

जिल्हाध्यक्ष तांगडे पाटील म्हणाले की, "शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून काढणे कठीण आहे, तरीही प्रशासनाने तातडीने सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी. या नुकसानीचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी व आयुक्तांकडे मांडणार असून, त्वरित मदत न मिळाल्यास आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल."

या पाहणी दौऱ्यात माजी शिक्षण सभापती शंकरराव जाधव, ज्येष्ठ नेते तुकाराम पाटील कळम, प्रदेश उपाध्यक्ष शेख शफीक, तालुकाध्यक्ष प्रा. राहुलकुमार ताठे, सरचिटणीस उबेद बापू देशमुख, शहराध्यक्ष शेख शाकीर, किसान सेल जिल्हाध्यक्ष हरिदास शेलार, उपाध्यक्ष अस्लम बागवान, कार्याध्यक्ष शकीर पठाण, युवक तालुकाध्यक्ष शंकर मानकर, नवनिर्वाचित युवक कार्याध्यक्ष दादाराव गोडसे, सचिव बापूसाहेब देशमुख, विद्यार्थी अध्यक्ष सतीश गोरे, कारभारी मोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते. बाधित शेतकरीही मोठ्या संख्येने या पाहणीला उपस्थित होते.

शेतकऱ्यांना तातडीची मदत मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक भूमिकेत दिसत आहे

.