अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी ‘मार्टि’ कार्यान्वित करा – कृती समितीची विधानसभा व परिषदेला मागणी!
महाराष्ट्र वाणी न्युज
मुंबई दि २६ :- राज्यातील अल्पसंख्याक समाज शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक विकासात अजूनही मागे असल्याने अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था (मार्टि) तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी मार्टि कृती समिती महाराष्ट्र यांनी केली आहे.
अल्पसंख्याक कल्याण समिती – महाराष्ट्र विधानसभा व विधानपरिषद सदस्यांना दिलेल्या निवेदनात पुढील ठोस मागण्या करण्यात आल्या आहेत –
1️⃣ मार्टि कार्यालय तातडीने सुरू करून कार्यरत करावे.
2️⃣ छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यालयासाठी निधी मंजूर करावा.
3️⃣ विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा त्वरित लाभ मिळावा यासाठी आवश्यक निधी मंजूर करावा.
4️⃣ अल्पसंख्याकांना समान लाभ धोरण लागू करावे.
5️⃣ अल्पसंख्याक आयुक्तालयातील प्रलंबित पदे तातडीने भरण्यात यावीत.
6️⃣ अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत व्हावी.
समितीने स्पष्ट केले की, शासन योजनांच्या अंमलबजावणीतील दिरंगाईमुळे विद्यार्थ्यांना व युवकांना अपेक्षित लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आता तातडीने ठोस निर्णय घेणे आवश्यक आहे.