अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेती दुरुस्तीसाठी राज्य सरकारने मुबलक निधी द्यावा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेती दुरुस्तीसाठी राज्य सरकारने मुबलक निधी द्यावा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेती दुरुस्तीसाठी राज्य सरकारने मुबलक निधी द्यावा विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी

महाराष्ट्र वाणी न्युज 

सिल्लोड दि २१:- सिल्लोड तालुक्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेल्या शेतीच्या दुरुस्तीसाठी राज्य सरकारने तातडीने मुबलक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी राज्याचे विधानपरिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा व चारनेर भागातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची त्यांनी आज रविवार, २१ सप्टेंबर रोजी शेतकऱ्यांच्या बांधावर जात पाहणी केली. 

अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून पिके, फळबागा व शेतीमालाचे आर्थिक संकट वाढले आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देणे ही सरकारची जबाबदारी आहे.नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना केवळ दिलासा नव्हे, तर प्रत्यक्ष मदत मिळाली पाहिजे. शेती दुरुस्ती व पुनर्बांधणीसाठी मुबलक निधी द्यावा,अशी मागणी दानवे यांनी केली.

सिल्लोड तालुक्यातील घाटनांद्रा व चारनेर भागात अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. परिसरातील 

पिके मोठ्या प्रमाणावर नदीला व ओढ्याला पूर आल्याने वाहून गेली आहे.शेतीची माती खरडून गेली असल्याने शेतीची दुरुस्ती करणे अत्यंत आवश्यक आहे. शेत पिकाच्या नुकसान भरपाईसह शेती दुरुस्तीसाठी राज्य सरकारने मुबलक निधी देऊन बळीराजाला साथ द्यावी. तसेच नदी व नाल्यावरील पूल खराब झाले आहे. संरक्षण भिंत वाहून गेल्या असल्याने या सर्वांच्या दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली.

याप्रसंगी माजी आमदार उदयसिंग राजपूत, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर पाटील, तालुकाप्रमुख संजय मोटे, निरीक्षक दिग्विजय शेरखाने,रामेश्वर काळे, शिवा गौर, भास्कर आहेर, नथू मोरे, वाल्मीक मोरे, संजय धनवई, दिनेश तांबे गणेश काळे व विश्वनाथ राकडे उपस्थित होते.