अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार मदत द्या – राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) ची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
महाराष्ट्र वाणी न्युज
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि ९ :- महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती, पिके, फळबागा, भाजीपाला यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक घरांची पडझड झाली असून जनावरे वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक संकट कोसळले आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनात राज्य सरकारने तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करावा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पंचनामे तातडीने करावेत, बाधित शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत त्यांच्या खात्यात जमा करावी तसेच गोरगरीब जनतेच्या घरांची पुनर्बांधणीसाठी आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
निवेदनात शेतकरी व नागरिक सध्या मोठ्या संकटात असून शासनाकडून वेगवान निर्णय होणे गरजेचे असल्याचे नमूद करण्यात आले. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला.
या प्रसंगी प्रदेश सरचिटणीस प्रा. शेख सलीम, मा. श्री. सय्यद तोफिक, शहराध्यक्ष आशिष पवार, महिला जिल्हाध्यक्ष छायाताई जंगले, जिल्हा प्रवक्ता शेख शफीक, युवक शहराध्यक्ष प्रशांत जगताप, विद्यार्थी शहराध्यक्ष सुशील बोर्डे, उद्धव बनसोडे, हरिदास शेलार, अशोक खोसरे, सोमीनाथ शिराने, ललितताई मगरे, लाईकुद्दीन भाई, मुकेश राठोड, सतीश देशमुख, राजेंद्र चव्हाण, रवी चव्हाण, आनंद मगरे, आशिष इंगळे, बादशहा शेख, अखलाख देशमुख, अशोक बनकर, अशोक पगारे, आश्रभ भाई, इरफान भाई, इरफान पठाण आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
👉 शेतकऱ्यांच्या डोळ्यातील पाणी पुसण्यासाठी सरकारने तात्काळ निर्णय घेणे काळाची गरज आहे.