अकोला मनपा सभेत ‘हुकूमशाही’चा आरोप; 16 विरोधी नगरसेवक थेट निलंबित!

अकोला मनपा सभेत ‘हुकूमशाही’चा आरोप; 16 विरोधी नगरसेवक थेट निलंबित!

 अकोला ( प्रतिनिधी) दि ३० :- अकोला महानगरपालिकेची आजची सभा प्रचंड गोंधळात पार पडली. विकासकामांच्या मुद्द्यावरून सुरू झालेली चर्चा काही क्षणातच तीव्र वादात बदलली आणि अखेर 16 विरोधी नगरसेवकांच्या निलंबनापर्यंत पोहोचली.

सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. ‘वंचित’ आणि काँग्रेसच्या नगरसेवकांनी सत्ताधाऱ्यांवर विकासकामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला, तर सत्ताधाऱ्यांनी सभागृहातील शिस्तभंगाचे कारण देत कठोर कारवाईचा निर्णय घेतला. या कारवाईनंतर सभागृहात एकच गोंधळ उडाला.

निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये मोहम्मद फजलु अब्दुल करीम, आझादखान अलियारखान, गवई पराग रामकृष्ण, देव निलेश रामकृष्ण, शेख शमशु कमर शेख साबीर, डॉ. जिशान हुसैन, विजय रामदास इंगळे, लंगोटे शंकर भाऊराव (स्वीकृत सदस्य), निलोफरखान सोहेलखान, आकाश श्रीकृष्ण कवडे (स्वीकृत सदस्य), अभय अशोक खुमकर, जैनबबी शेख इब्राहिम, अशिया परवीन मोहम्मंद शारिक, पातोडे उज्वला प्रविण, सुवर्णरेखा विजय जाधव आणि बहादुरकर जयश्री महेंद्र यांचा समावेश आहे.

या निर्णयावर विरोधकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत भाजपवर ‘हुकूमशाही’चा गंभीर आरोप केला आहे. तसेच, ही कारवाई अन्यायकारक असल्याचे सांगत न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. त्यामुळे अकोल्यातील राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

 ही कारवाई योग्य की अन्यायकारक? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की सांगा!

📲 तुमच्या भागातील बातम्या आम्हाला WhatsApp करा: 7972649612

“अकोल्यात राजकारण तापलंय… पुढचा स्फोट कधी होतोय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार!”