अंभई (ता. सिल्लोड) येथे महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचे भव्य उद्घाटन

अंभई (ता. सिल्लोड) येथे महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचे भव्य उद्घाटन

अंभई (ता. सिल्लोड) दि २ जुन :– जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या आदेशानुसार व सिल्लोड तहसीलदार संजय भोसले यांच्या हस्ते अंभई येथे महसूल मंडळ अधिकारी कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची उपस्थिती लाभली.

या वेळी विशेष उपस्थितीत पत्रकार अमोल नगरे, गावाचे सरपंच रामदास दुतोंडे, उपसरपंच रईस देशमुख, बाजार समितीचे संचालक दामु अण्णा गव्हाणे, तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि गावातील विविध प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार संजय भोसले यांनी नवीन महसूल मंडळ कार्यालयामुळे गावातील नागरीकांना शासकीय कामकाजासाठी सिल्लोडला वारंवार जावे लागणार नसल्याचे सांगितले.

कार्यक्रम अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. नवीन कार्यालयामुळे गावातील नागरी प्रशासन अधिक प्रभावीपणे पार पडेल अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.