"स्टॅम्प पेपरवर लढाईचा करार! – संजय गायकवाडांचा इम्तियाज जलील यांना थेट खुला आव्हान"

"स्टॅम्प पेपरवर लढाईचा करार! – संजय गायकवाडांचा इम्तियाज जलील यांना थेट खुला आव्हान"

महाराष्ट्र वाणी न्युज 

बुलढाणा दि २३ जुलै:- एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी इम्तियाज जलील यांच्याशी होणाऱ्या लढाईसंदर्भात थेट ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर करारनामा केला आहे. या करारात त्यांनी स्पष्ट केलं आहे की, जलील आणि त्यांच्या दरम्यान लढाई होणार असून त्यामध्ये कोणतेही शस्त्र, अस्त्र, दगड, धोंडे किंवा कोणत्याही प्रकारचं हिंसक साहित्य वापरले जाणार नाही.

या लढाईत कोणताही तिसरा व्यक्ती सहभागी होणार नाही, याची जबाबदारी पोलीस यंत्रणांनी घ्यावी, असं गायकवाड म्हणाले. लढाईची तारीख आणि वेळ ठरवण्याचं अधिकार इम्तियाज जलील यांच्याकडे देण्यात आला आहे. दोघांच्याही कोणत्याही प्रकारचं शारीरिक नुकसान झाल्यास जबाबदारी एकमेकांचीच असेल, असंही करारात नमूद आहे.

संजय गायकवाड यांनी स्पष्ट केलं की, या संपूर्ण प्रकरणात पक्ष, धर्म, मित्रमंडळी, नातेवाईक वा कार्यकर्त्यांना सामील केला जाणार नाही. दरम्यान, मुंबईतील आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये झालेल्या कथित वादानंतर जलील यांनी गायकवाड यांना मारण्याचं आव्हान दिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. बुलढाण्यातील सभेत जलील यांनी ही धमकी दिल्याचा दावा गायकवाड यांनी केला.

या प्रकारामुळे महाराष्ट्रातील राजकारणाचा स्तर किती घसरला आहे, यावर नागरिकांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, "लोकप्रतिनिधींनी स्वतःचं भान ठेवावं, असं राजकारण महाराष्ट्राने याआधी पाहिलं नव्हतं," अशी टीका केली जात आहे.

शेवटी एकच सवाल – जनतेच्या कामांसाठी निवडून आलेले लोकप्रतिनिधी, आता व्यक्तिगत लढाया करारावर उतरवणार का?