शेतकऱ्यांनो, कर्ज मिळवायला आता रांगेत उभं राहायची गरज नाही – जिल्हाधिकाऱ्यांचा 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम सुरू

"शेतकऱ्यांनी अर्ज करा, बँका त्वरीत कर्ज द्या," असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिला.

शेतकऱ्यांनो, कर्ज मिळवायला आता रांगेत उभं राहायची गरज नाही – जिल्हाधिकाऱ्यांचा 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम सुरू
शेतकऱ्यांनो, कर्ज मिळवायला आता रांगेत उभं राहायची गरज नाही – जिल्हाधिकाऱ्यांचा 'अर्ज द्या, कर्ज घ्या' उपक्रम सुरू

महाराष्ट्र वाणी न्युज 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद), दि. ९ जुलै :– खरीप हंगाम मध्यावर आलेला असताना जिल्हा प्रशासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. "शेतकऱ्यांनी अर्ज करा, बँका त्वरीत कर्ज द्या," असा स्पष्ट संदेश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिला.

शेतकऱ्यांना वेळेत पीक कर्ज मिळावे यासाठी जिल्ह्यात ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’ हे विशेष अभियान ३ ते १० जुलै दरम्यान सुरू आहे. आज चित्तेगाव येथे झालेल्या कर्ज मेळाव्यात जिल्हाधिकारी स्वतः उपस्थित राहून शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला.

“शेतकरी वेळेवर कर्ज घेतलं पाहिजे आणि बँकांनीही उशीर न करता कर्ज द्यावं, हेच यामागचं उद्दिष्ट आहे,” असं जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले.

या अभियानाअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील ९३,१०२ शेतकऱ्यांना ७३० कोटींचं पीक कर्ज वितरित करण्यात आलं असून, यातील ५९ कोटींचं वाटप गेल्या सहा दिवसांतच (३ ते ९ जुलै) ६,४०५ शेतकऱ्यांना झालं आहे. यंदाच्या हंगामात एकूण १.५९६ कोटी रुपयांचं उद्दिष्ट असून त्यातील ४२% वाटप पूर्ण झालं आहे.

जिल्ह्यातील १.८७ लाख शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं नुतनीकरण अद्याप बाकी असून जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना जुनं कर्ज नुतनीकरण करून घ्यावं, असं आवाहनही केलं.

कर्ज मेळाव्यात अनेक शेतकऱ्यांना पीक कर्ज मंजुरीची पत्रे देण्यात आली. यावेळी चित्तेगाव व चित्ते-पिंपळगावच्या सरपंचांसह महसूल, कृषी व सहकार विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

कर्जासाठी घाबरू नका – अर्ज करा, वेळेवर कर्ज घ्या आणि खरीप यशस्वी करा!